रितेश देशमुखचा मुलगा राहिलचे फिटनेस चॅलेंज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/rahil-riteish-deshmukh-.jpg)
केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरू केलेल्या #HumFitToIndiaFit चॅलेंजला देशभरातील नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. भारतात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बॉलीवुडमधील कलाकारांसह राजकीय नेत्यांनी यात सहभाग नोंदविला होता. याच प्रकारे आता #BachceFitTohDeshFit चॅलेंजची सुरूवात करण्यात आली आहे. हे चॅलेंज मराठमोळ्या रितेश देशमुखच्या दोन वर्षिय मुलगा राहिल याने दिले आहे.
लहान मुलांच्या फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर खुपच स्तुती करण्यात येत आहे. जेनेलियाने आपला मुलगा राहिलचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात राहिल ऍडव्हेंचर्स ऍक्टिव्हिटी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत जेनेलियाने लिहिले की, राहिलने आपल्या बाबाचे #FitnessChallenge स्वीकार केले आहे.
आता तो बच्चा गॅंगला चॅलेंज देत आहे… #BachceFitTohDeshFit. चिमुकल्या राहिलने #BachceFitTohDeshFit हे चॅलेंज अनेक स्टारकिड्सना दिले आहे. यात सलमान खानचा भाचा आहिल, करीना-सैफ यांचा मुलगा तैमूर, करण जोहरचे मुले (यश-रूही), तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य यांचा समावेश आहे.
जेनेलियाने पोस्ट केलेल्या व्हिडिओला करण जोहरने ट्वीट करत म्हटले की, OMG!!! याला बघा. हा तर रॉकस्टार आहे. दरम्यान, यापूर्वी अजय देवगनचा मुलानेही फिटनेस चॅलेंच दिले होते. तो व्हिडिओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.