breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

राम गोपाल वर्माकडून कोरोनावर मजेशीर ट्विट

मुंबई | देशभरात बुधवारी नवे ४५० लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. आतापर्यंत हा आकडा १९००च्या घरात पोहोचला आहे. आतापर्यंत ५९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांने केलेलं ट्विट हे परिस्थितीची थट्टा करणारं आहे.

बुधवारी ‘एप्रिल फूल’ या एक एप्रिल तारखेची संधी साधत राम गोपाल वर्मा याने एक ट्विट केलं. या ट्विटमधून त्याने कोरोनाचं गांभीर्य बाजूला सारत थट्टा करण्यात आली. त्याने काल दिवसभरात तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,’माझ्या डॉक्टरांनी मला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे.’ असं ट्विट केलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये माफी मागितली आहे. पण ही चूक माझी नाही तर डॉक्टरची असल्याचं म्हणतं खिल्ली उडवली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,’निराशा केली असेल तर माफ करा. मला डॉक्टरांनी हा एप्रिल फूल जोक सांगितला. यात माझी चुकी नाही… त्यांचीच चूक’ असं म्हणतं त्याने ही गोष्ट मस्करीत केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button