breaking-newsमनोरंजन

रातोरात स्टार झालेली रानू मंडलवर, पुन्हा आली स्टेशनवर गाण्याची वेळ

मुंबई – रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणारी रानू मंडल रातोरात स्टार झाली. तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं तिचं आयुष्य बदललं. पण हे चांगले दिवस कायमचे राहिले नाहीत. आता काही दिवसांतच रानूवर पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ आली आहे. ती सध्या तिच्या जुन्या घरीच राहत असल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं रानू एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती. तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर तिला बॉलिवडू चित्रपटात गाणं गायची संधी देखील मिळाली. पण वाट्याला आलेलं हे स्टारडम रानूला टिकवता आलं नाही. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत असे परंतू तिला हे सर्व हाताळता आलं नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button