“राझी’ने जमवला 207 कोटींचा गल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/raazi-1.jpg)
बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर “राझी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. “राझी’ हा असा दुसरा महिला केंद्रित बॉलीवूडमधील चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल 122.07 कोटींचा गल्ला जमविला आहे. या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्ड वाइड 207 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती करण जोहरने सोशल मीडियावर दिली आहे.
11 मे रोजी हा “वूमन ओरिएन्टेड’ चित्रपट प्रदर्शीत करण्यात आला होता. राझी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतरही गेले 6 आठवडे चित्रपटागृहात आहे. हरिंदर सिक्का याचे “कॉलिंग सहमत’ या पुस्तकाला मेघना गुलझारने खूप सुंदर रूपात चित्रपटातून मांडले आहे.
आलियाच्या सर्वाधिक कमाईच्या चित्रपटाबाबत सांगायचे झाल्यास “राझी’चा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर दुसरा क्रमांक हा “बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाचा आहे. यात ती वरूण धवणसोबत झळकली होती. या चित्रपटाने 116.68 कोटी रुपयांची कमाई केली होती. “राझी’चे कलेक्शन पाहता हा आलियाच्या कारर्किदीतील आतापर्यंतचा सुपर हिट चित्रपट आहे.