Breaking-newsमनोरंजन

राज कपूर यांच्या नातवाचा साखरपुडा

राज कपूर यांचा नातू आणि अभिनेत्री करिना कपूर व करिश्मा कपूर यांचा आत्येभाऊ अरमान जैन याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. प्रेयसी अनिसा मल्होत्रा हिच्यासोबत छोटेखानी समारंभात हा साखरपुडा पार पडला. या समारंभाचे काही फोटो करिश्माने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अरमान जैन हा राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा मुलगा आहे. अरमान व अनिसा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून हे दोघं डेट करत आहेत. पण अरमानने प्रसारमाधमांसमोर हे नातं कधीच मान्य केलं नाही. कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत अरमानचा साखरपुडा पार पडला.

अरमानने ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला. त्यापूर्वी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करण जोहरसोबत काम केलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button