रजनीकांत यांच्या ‘दरबार’ चित्रपटासाठी एका कंपनीने दिली कर्मचा-यांना भर पागारी सुट्टी…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-16.png)
अभिनयताला देव मानना-या सुपरस्टार रजनीकांत यांचा नवा चित्रपट दरबार आज प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही रजनीकांत यांचे चाहते या नव्या चित्रपटासाठी खास तयारी करत आहेत. रजनीकांत या चित्रपटात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बर्याच वर्षांनंतर ते पोलिसाची भूमिका सकारात आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-8.png)
रजनीकांतच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बराच उत्साह आहे. त्यात एका कंपनीने हा चित्रपट पाहण्यासाठी आपल्या कर्मचार्यांना भर पगारी रजा आणि विनामूल्य तिकिटे सुद्धा देऊ केली आहेत. जेणेकरून हे लोक त्यांच्या आवडत्या स्टारच्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-5.png)
खास गोष्ट म्हणजे रजनीकांत यांचा प्रत्येक चित्रपट रिलीज होताना ही कंपनी कर्मचाऱ्यांसाठी ही ऑफर देते. सध्या सोशल मिडियावर या ऑफिसकडून दिलेल्या पत्राची प्रत व्हायरल होत आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगादास करीत असून या कॉप ड्रामामध्ये सुनील शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतकेच नाही तर मदुराई येथे रजनीकांतच्या चाहत्यांनी त्याच्या आगामी ‘दरबार’ चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी मंदिरात खास प्रार्थना देखील केली. चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून चाहत्यांनी 15 दिवसांचा उपवास केला आहे, जमिनीवर अन्न खाल्ले आहे. दक्षिणेकडे अशी ही रजनीकांतची क्रेझ पाहायला मिळत आहे.