breaking-newsमनोरंजन

रजनीकांतच्या “पेट्टा’चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूडमधील सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिनानिमित्त आगामी “पेटा’ बहुप्रतीक्षित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. रजनीकांतशिवाय “पेटा’च्या ट्रेलरमध्ये प्रसिद्ध कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी, विजय सेथुपत्ती, सिमरण आणि त्रिशा यांचीही झलक पाहायला मिळत आहे.

रजनीकांत यांनी ट्रेलरमधूनही आपला नेहमीप्रमाणेच अनोखा अंदाज दाखवून चाहत्यांवर भूरळ पाडली आहे. या चित्रपटात ऍक्‍शन आणि लव्हस्टोरी असा कॉम्बो पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरुन दिसत आहे. या चित्रपटाचा टीझरही काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरमध्ये 1990च्या दशकातील त्याचे काही फोटो दाखविण्यात आले होते.

या चित्रपटात रजनीकांत आणि कार्तिक सुब्बाराज पहिल्यांदाच एकत्रित काम करणार आहेत. नवाजुद्दीन चित्रपटात सिंगार सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. कार्तिक सुब्बाराज यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button