breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘या’ चित्रपटात अजिंक्य देव झळकणार प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत…

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला चेहरा म्हणजे ‘अजिंक्य देव’. मराठी,हिंदी, मालिका तसेच चित्रपटात आपला दमदार अभिनय त्यांनी दाखवला…अजिंक्य देव आता लवकरच ‘झोलझाल’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पुनरागमन करत आहेत. २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘नागपूर अधिवेशन’ हा त्यांचा मराठीतील शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर अजिंक्य देव यांनी त्यांच्या अभिनयाचा मोर्चा बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीत वळवला.

 अनेक हिंदी आणि इंग्लिश चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसून आलेले अजिंक्य देव यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात सुद्धा ते महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. ‘झोलझाल’ या आगामी मराठी चित्रपटात अजिंक्य देव ‘अभिमन्यू शिंदे’ या एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांना अजिंक्य देव महत्वाच्या आणि मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव यांच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू रसिकांना पाहायला मिळणार आहेत.  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button