Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘मी एक काजवा’,पुष्कराज चिरपुटकरचा ‘हा’ पु. ल. देशपांडेंचा अंदाज…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-74.png)
‘दिल दोस्ती दुनियादारी’सारखी मालिका आणि ‘बापजन्म’, ‘मंत्र’ अशा सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता पुष्कराज चिरपुटकर फारसा कुठे दिसत नव्हता. आता आगामी ‘मी वसंतराव’ या चित्रपटात तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
त्याचा या सिनेमातला लूक नुकताच समोर आला असून, तो पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. भूमिकेबद्दल तो म्हणाला, की ‘पुलं आजवर अनेकांनी साकारले आहेत. पण, सूर्य एकच असतो बाकी सगळे काजवे असतात. मी त्यातलाच एक काजवा आहे. भूमिकेतलं लोकांना काही भावलं तर ते श्रेय पुलंचंच असेल.’