breaking-newsमनोरंजन

‘माय नेम इज लखन’मध्‍ये अर्चना व परमीत साकारणार ‘ही’ भूमिका

प्रतिभावान पती-पत्‍नी जोडी अर्चना पुरन सिंग आणि परमीत सेठी दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दोघांनीही वैयक्तिरित्‍या एक कलाकार किंवा एक दिग्‍दर्शक म्‍हणून क्षेत्रामध्‍ये आपले नावलौकिक केले आहे. ही जोडी टेलिव्हिजन स्क्रीनवर कधीच एकत्र दिसलेली नाही. सोनी सबवरील नवीन मालिका ‘माय नेम इज लखन’ वास्‍तविक जीवनातील या पती-पत्‍नी जोडीला रील लाइफ पती-पत्‍नी म्‍हणून सादर करण्‍यास सज्‍ज आहे.

परमीतसोबत काम करण्‍याच्‍या अनुभवाबाबत बोलताना अर्चना पुरन सिंग म्‍हणाली, ”मला चांगले विरूद्ध वाईट या संकल्‍पेनवर आधारित असलेली मालिका ‘माय नेम इज लखन’मध्‍ये परमीतसोबत पडद्यावर काम करताना खूप छान वाटत आहे. माझा दृढ विश्‍वास आहे की, ट्रॅजेडी व कॉमेडीमध्‍ये दृढ संबंध आहे. या मालिकेतील ड्रामा हा खरेतर ट्रॅजेडी नसून कॉमेडी असल्‍यामुळे मी ही मालिका करत आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button