‘माझ्या नवऱ्याची बायको’ मध्ये पुन्हा जुन्या शनायाची एन्ट्री आणि नविन शनायाची एक्झिट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-5.jpg)
झी मराठी वरील मालिका माझ्या नवऱ्याची बायको मधील शनाया ही भूमिका जरी नकारात्मक असली तरी ती प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरलेली. सुरुवातीपासून ही भूमिका साकारलेली रसिका सुनील जेव्हा शिक्षणासाठी शो सोडून गेली , तेव्हा मात्र तिच्या आणि मालिकेच्या फॅन्सची निराशा झाली होती, यानंतर हीच भूमिका बानुबया म्हणजेच इशा केसकरकडे सोपवण्यात आली. आणि ईशाने सुद्धा अगदी कमी काळात या भूमिकेतून पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकून घेतली, पण आता इशा सुद्धा ही मालिका सोडत आहे. यामागचं कारण सांगत तिने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडीओ पोस्ट करून दिलं आहे. एकीकडे जुनी शनाया म्हणजेच रसिका सुनील पुन्हा मालिकेत येत आहे तो आनंद असतानाच ईशाला सुद्धा नक्कीच मिस करू अशा प्रतिक्रिही प्रेक्षकांनी तिच्या व्हिडिओवर दिल्या आहेत.
लॉकडाऊन नंतर 29 जून पासून माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचे शूटिंग सुरु होणार होतं. नाशिक मधील एका रिसॉर्ट मध्य हे शूटिंग होणार होतं, मात्र त्याआधीच ईशाला ताप येत होता. अक्कलदाढ काढल्याने हा ताप येत होता. ही दाढ काढण्यासाठी तिला ऑपरेशन करावं लागलं होतं आणि त्याची बरीच प्रोसेस अजूनही बाकी आहे, या कारणामुळं तिला शूटिंगला लगेचच जाता येणार नव्हतं. लॉक डाऊन मुले अगोदरच मालिकेचे बँक मधील एपिसोड्स संपले होते अशा वेळी नवीन शूटिंग थांबवता येणार नव्हतं म्हणून शेवटी ईशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, येत्या आठवड्यात हे नवीन एपिसोड्स सुरु होण्याची शक्यता आहे. माझ्या नवर्याची बायको चे शुटींग जरी सुरु झाले असले तरी, शनाया म्हणजेच रसिका पुन्हा नेमकी कधी दिसणार याबाबत मालिकेच्या टीम कडुन काहीही सांगण्यात आलेले नाही.