माझा बायोपिक खान किंवा अक्षय कुमारने करू नये असे वाटायचे
हॉकीपटू संदीप सिंगचा बायोपिक “सूरमा’ या शुक्रवारी रिलीज होणार आहे. संदीप् सिंगच्या मुख्य रोलमध्ये दिलजीत दोसान्ज असणार आहे. आपल्यावरील बायोपिक संदर्भात बोलताना संदीप सिंग म्हणाला की आपल्यावरील बायोपिक बॉलिवूडमधील कोणाही खान किंवा अक्षय कुमारने बनवू नये असे वाटत होते. आपल्या रोलमध्ये दिलजीत दोसान्जच एकदम परफेक्ट वाटतो. आपल्यावरील सिनेमा कोणत्याही बड्या स्टारने करूच नये, असेच आपल्यला पहिल्यापासून वाटत होते, असेही संदीप सिंगनी सांगितले.
आमिर खान, शाहरुख किंवा अक्षय यापैकी कोणीही हा रोल केला असता, तर अप्रतिमच केला असता. मात्र प्रेक्षकांना हा स्टार कलाकारच दिसला असता. संदीप सिंग दिसलाच नसता. याच दरम्यान दिलजीत दोसान्जने “उडता पंजाब’च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मुख्य भूमिकेसाठी आम्हाला योग्य कलाकार मिळाला, असे संदीपने सांगितले.
संदीप सिंगच्या रोलसाठी दिलजीत दोसान्जच्या आगोदर रणबीर कपूरला पहिली पसंती दिली गेली होती. मात्र त्याच्या तारखा उपलब्ध नसल्याचे दिलजीतची निवड फायनल झाली.”सूरमा’मध्ये दिलजीत दोसान्जबरोबर तापसी पन्नूही असणार आहे.