मल्लिका शेरावत बनणार “गुड वाईफ’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/mallika-sherawat-.jpg)
मल्लिका शेरावतला आपण नेहमीच बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल रोलमध्ये बघत आलो आहोत. तिच्यावर तशाच रोलचा शिक्का बसायला लागला होता. मात्र आता तिच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. हा प्रोजेक्ट तिच्यासाठी करिअरची दिशा बदलणारा ठरू शकतो.
अमेरिकेतील एका प्रसिद्ध टिव्ही शो च्या भारतीय व्हर्जनचे सूत्रसंचालन मल्लिका करणार आहे. या शो चे नाव आहे “गुड वाईफ’ भारतीय प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून या टिव्ही शो ची फेरनिर्मिती केली जात आहे. “द गुड वाईफ’ हा शो 2009 ते 2016 दरम्यान सुरू होता. त्याच्या पाचव्या सिजनमध्येही खूप मोठी लोकप्रियता मिळवली आहे. अमेरिकेतील कुक प्रांताचे ऍटर्नीची पत्नी एलिसिया फ्लोरिकची कथा यामध्ये आहे.
पती सेक्स आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकल्यावर एलिसियाने लॉ प्रॅक्टिस सुरु केली. या टिव्ही शो चा राजकारण, समाज आणि कायद्यावरही खूप परिणाम झाला. या शो ने अनेक लोकांना आकर्षित केले. यामध्ये महिलांशी संबंधित अनेक विषयांना हात घातला गेला होता. त्यामुळेच लोकांनी या सिरीजला डोक्यावर उचलून घेतले होते आणि या शो ला खूप पुरस्कारही मिळाले होते.