भारत-नेपाळ वादावरील ट्विटमुळे मनीषा कोयराल ट्रोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/manisha-koirala-M.jpg)
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यात वाद सुरू आहे. त्यावर आता बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोयरालाने वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपले मत मांडले आहे.
मनिषाने नेपाळच्या नवीन राजकीय नकाशाचे समर्थन केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. मनीषाचा जन्म नेपाळच्या काठमांडूमध्ये झाला आहे. त्यामुळे भारतात नेपाळचं समर्थन करणं तिला महागात पडलं आहे.
दरम्यान, मनीषाने ट्विट करुन नेपाळच्या संसदेत पास केलेल्या नकाशाबद्दल आनंद व्यक्त केला. तिने ट्विट करत लिहलं आहे की, ‘क्षेत्रिय सार्वभौमत्व, राजकीय सार्वभौमत्व, आर्थिक सार्वभौमत्व हे सर्व मिळून सार्वभौमत्व राज्य तयार होतं. त्यामुळे यावर विचार करायला हवा. असं ट्विट तिने केलं आहे.
या ट्विटवर आपण ट्रोल होत असल्याचं लक्षात येताच ती पुन्हा ट्विट करत म्हणाली, ‘आपण सर्व जण या परिस्थित एकत्र आहोत. आपली सरकार या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल.’ यावेळी आपण सुसंस्कृत होणे आवश्यक असल्याचं देखील ती म्हणाली.