बीग बीची नात नव्याचे फोटो व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/navya.jpg)
बॉलीवूडमध्ये सध्या अनेक स्टार किड्स आपले नशिब आजमावण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यासाठी ते जोरदार तयारीही करत आहेत. जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांचे बॉलीवूडमध्ये डेब्यू निश्चित झाले आहे. आता आणखी एका स्टार किडवर सर्वांची नरज आहे. ती म्हणजे बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा जी अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदाची मुलगी आहे.
नव्याचे काही फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून त्याला अनेकांची पसंती मिळत आहे. मात्र, नव्याने अद्याप अधिकृतपणे अभिनय क्षेत्रात करिअर करणार असल्याचे सांगितलेले नाही. तसेच तिच्या कुटुंबियांकडूनही तसे सूचित करण्यात आलेले नाही. परंतु नव्याचा अंदाज आणि हॉट लुक पाहता ती या ग्लॅमर दुनियेत येण्याची तयारी करत असल्याचे दिसते.
अमिताभ बच्चन यांनी नव्याचे शेअर केलेले फोटो पाहिले असता नव्याने आता मोठया पडद्यावर पदार्पण केले पाहिजे असेच तुम्हाला वाटेल. मात्र, नव्याने हे फोटो एका कंपनीच्या प्रमोशनसाठीचे आहेत. विशेष म्हणजे, या फोटोत नव्यासोबत तिची आई श्वेताही पोज देताना दिसत आहे.