‘बालिका वधू’ या लोकप्रिय मालिकेच्या दिग्दर्शकावर उदरनिर्वाहासाठी भाजी विकण्याची वेळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-27.jpg)
कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटाच्या परिस्थितीचा फटका सर्वांनाच बसला आहे. अनेकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. बिकट आर्थिक परिस्थिती आता सर्वांवरच ओढावलेली आहे. त्यात कलाविश्वही अपवाद ठरलेलं नाहीये. ‘बालिका वधू’ या एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेल्या मालिकेच्या दिग्दर्शकावर आता उदरनिर्वाहासाठी भाजी विकण्याची वेळ आली. आता या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्यानं ही बाब समोर आणली असून, संपूर्ण टीम त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यानं म्हटलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/2-5.jpg)
रामवृक्ष असं या दिग्दर्शकाचं नाव आहे. सध्या ते उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी भाजी विकण्याचं काम करत आहेत. लॉकडाऊनचा काळ सुरू झाल्यानंतर रामवृक्ष त्यांच्या गावी उत्तर प्रदेशला गेले होते. मात्र, दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होऊ लागल्यामुळे त्यांनी भाजी विकण्यास सुरुवात केली. सध्या ते सायकलवरुन दारोदारी भाजी विकत आहेत. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बालिका वधू’ या मालिकेची टीम आता त्यांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Untitled-3-1024x589.png)
‘बालिका वधू’ या मालिकेत भूमिका साकारणारे अनुप सोनी यांनी नुकतंच एका मुलाखत सांगितलं ‘आमची ‘बालिका वधू’ची टीम त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. जमेल त्या पद्धतीनं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.’ रामवृक्ष यांनी यापूर्वी अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.