Breaking-newsमनोरंजन
फॅशन जगतात शाहरूख खानच्या मुलीचे पदार्पण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/suhana-khan1-.jpg)
- वयाच्या 18 व्या वर्षी केले पहिले फोटोशूट
बाॅलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिची अोळख बी-टाऊनमध्ये सर्वात प्रसिध्द स्टारच्या मुलांमध्ये होते. सुहाना सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. भलेही ती माध्यमांच्या दृष्टीक्षेपापासून दूर असली तरीही तिला सतत बातमीमध्ये कसं राहायचं हे चांगलंच माहित आहे. ‘सुहानाला माझ्यासारखं ग्लॅमर इंडस्ट्रीजमध्ये करिअर करायचं आहे’, असं जरी शाहरूखने अनेकदा म्हटलं असलं तरी केवळ वयाच्या 18 व्या वर्षी सुहाना हिने फॅशन जगतात पाऊल ठेवले आहे.
सुहाना हिने तिचे पहिले फोटोशूट केले आहे. वोग या प्रसिध्द मासिकाच्या आॅगस्ट एडिशनच्या मुख्यपृष्ठावर सुहाना तिच्या सिजलिंग अवतारामध्ये दिसत आहे. वोग इंडियाने अापल्या इस्टाग्राम अकाउंटवर सुहानाच्या पहिल्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना काही तासात हजारोच्या घरात लाईक सुध्दा मिळाले आहेत. तसेच वोग इंडियाने या फोटोशूटच्या मागील काही प्रसंगांचा व्हिडीअो देखील यू ट्यूबवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओलादेखील चांगली पंसती मिळत असल्याचे दिसून येत आहे.