फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अवतरलं एक सुंदर फुलपाखरू …सर्वांच्या नजरा त्याच्यावरच…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-131.png)
नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात एक सुंदर फुलपाखरू रेड कार्पेटवर अवतरलं होत… हे फुलपाखरू म्हणजे अभिनेत्री तापसी पन्नू होती…तिने सर्वाधिक लक्ष वेधलं होत… बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत तापसी सर्वांहून वेगळी आहे. ग्लॅमरस कपडे परिधान करणं किंवा रेड कार्पेट लूकबद्दल चिंता करणाऱ्या अभिनेत्रींपैकी तापसी नक्कीच नाही. तिच्या लेखी कामाला, सर्वाेत्तम अभिनयाला अधिक महत्त्व आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/3-1.png)
चांगल्या दिसण्यापेक्षा चांगला अभिनय महत्त्वाचा हे केंद्रस्थानी ठेवून वावरणाऱ्या अभिनेत्रींपैकी तापसी एक आहे. मात्र यावेळच्या फिल्म फेअर पुरस्कारादरम्यानं रेड कार्पेटवर सर्वांत प्रभावी लूकमुळे तापसीनं सर्वांचं लक्ष वेधलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-37.png)
तिचं वर्णन करायचं झालंच तर फुलांवर उडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखराप्रमाणे तापसी भासत होती. या लूकनं तापसीनं सर्वांनाच स्वत:कडे आकर्षित केलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1-8.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/2-6.png)
तापसीनं रेडकार्पेट लूकसाठी फवाद सरकीसच्या बटरफ्लाय गाऊनची निवड केली. यावर तापसीनं केलेला बोल्ड आयमेकअपही उठून दिसत होता. खरं तर फुलपाखरू नाजूक असतं, मात्र या बटरफ्लाय गाऊनमध्ये तापसी अत्यंत प्रभावी दिसत होती.