प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशाल पंजाबीची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Kushal-Punjabi.jpg)
मुंबई | प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशाल पंजाबी याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी कुशलने टोकाचा निर्णय घेतल्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
वांद्र्यातील पाली हिल परिसरात असलेल्या घरात कुशलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना मृतदेहासोबत सुसाईड नोटही सापडलेली आहे. कुशलने काल (गुरुवारी) रात्री आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. कुशलच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. अभिनेता करणवीर बोहरा याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कुशल पंजाबीच्या आत्महत्येची धक्कादायक बातम शेअर केली. ‘तुझ्या मृत्यूच्या बातमीने मला धक्का बसला आहे. मला अजूनही यावर विश्वास बसत नाही. मला माहित आहे तू जिथे असशील तिथे आनंदी असशील. तू ज्या पद्धतीने आयुष्य जगायचास, त्याने मला प्रेरणा मिळाली. पण मला काय माहित?’ अशी इमोशनल पोस्ट करणवीर बोहराने लिहिली आहे.