breaking-newsमनोरंजन

पोलिसांकडून दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट यांची तब्बल २ तास कसून चौकशी

मुंबई- मुंबई पोलिसांकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात अनेक दिग्ग्ज लोकांची चौकशी केली जात आहे. आज दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट यांचाही जबाब सांताक्रूझ पोलिसांनी नोंदवून घेतला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 37 जणांची चौकशी झाली आहे.

अभिनेत्री कंगणा रानौत हिने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी महेश भट, करण जोहर, आदित्य चोप्रा, राजीव मासंद यांची चौकशी करावी अशी मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती. काल पोलिसांनी दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता महेश भट सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर जवळपास दोन तास त्यांची पोलिसांनी चौकशी केली. महेश भट यांनी पोलिसांना काय उत्तरे दिली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. महेश भट यांच्या जबाबानंतर या प्रकरणात आता कोणता मोठा खुलासा होणार याकडे बॉलिवूड सृष्टीचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button