पायाला येऊन बिलगलेल्या चिमुकलीकडे करिनाने ढुंकूनही पाहीलं नाही…सोशल मीडियावर होतेय ट्रोल…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new-35.png)
मुंबई |महाईन्यूज|
महाईन्यूज 25 डिसेंबरला नाताळचा सण सर्वांनीच उत्साहात साजरा केला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी नाताळ धुमधडाक्यात साजरा केला. अनेक सिता-यांनी नाताळनिमित्त खास पार्टी ठेवली होती. करिना कपुरनेही नाताळनिमित्त खास पार्टी ठेवली होती….पार्टी साजरी केल्यानंतर नाताळच्या दिवशी करिना तैमूरला घेऊन मुंबईच्या माऊंट मॅरी चर्चमध्ये पोहोचली.याच वेळेस निघालेल्या एका व्हिडीओमुळे करिना चांगलीच ट्रोल होतेय.
करिना चर्चमधून बाहेर पडताना एक भिक मागणारी छोटी मुलगी तिच्या पायाला बिलगली. पण करिनाने तिच्याकडे ढुंकूनही पाहीलं नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करत करिना पुढे निघून गेली. त्यावेळेस एक महिला पोलिसही भिक मागणा-या त्या मुलीला करिनापासून दूर लोटताना दिसतेय. करिनाच्या या वागण्यामुळे ती ट्रोल होतेय…करिनाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी तिला फैलावर घेतले. एवढी श्रीमंती असून एका गरिब मुलीला मदत करू शकत नाही, लाज वाटायला हवी, अशा शब्दांत अनेकांनी तिला सुनावले आहे. गरिब मुलीला करिनापासून दूर करणा-या महिला पोलिसालाही लोकांनी ट्रोल केले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new2.png)