‘नो टाइम टू डाय’ चित्रपटाचा ट्रेलर 10 भाषांमध्ये रिलीज, मात्र पाच लँग्वेजमध्येच रिलीज होईल चित्रपट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/007.jpg)
डेस्क | जेम्स बॉन्ड सीरीजचा 25 वा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ चा ट्रेलर 10 भाषांमध्ये रिलीज केला गेला आहे. हिंदी, इंग्रजीसोबत बॉन्डचे फॅन्स हा ट्रेलर भोजपुरी, तमिळ, तेलगु, गुजराती, मराठी, पंजाबी, बंगाली, पंजाबी, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये पाहू शकतात. भारतात हा चित्रपट 8 एप्रिलला रिलीज होऊ शकतो.
चित्रपटाची विशेष बाब ही आहे की, याचा क्लायमॅक्स तीन वेगवेगळ्या पद्धतीने शूट केला गेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कॅरी जोजी फुकुनागा यांच्यानुसार, त्यांची इच्छा नव्हती चित्रपटाची कोणतीही माहिती लीक व्हावी.
डॅनियल क्रेगच्या चित्रपटाचा ट्रेलर भले 10 भाषांमध्ये दिसणार आहे, पण चित्रपट केवळ 5 भाषांमध्येच रिलीज होईल. ओरिजनल लँग्वेज इंग्लिशसोबतच हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज होईल.
चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेला 51 वर्षांचा डॅनियल क्रेग सर्वात जास्त काळ बॉन्डची भूमिका साकारत असलेला अभिनेता बनला आहे. त्याने 2005 पासून आतापर्यंत 4 जेम्स बॉन्ड चित्रपट केले आहेत. आगामी “नो टाइम टु डाय” त्याचा पाचवा चित्रपट असेल.