Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
नेटीझन्स म्हणतात… अभिनेता अजय देवगनचा ‘तानाजी’ चित्रपट का पहावा? वाचायला विसरू नका!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/eb4feb36-4a79-4ae3-af56-131c8c3cd94c-crop-c0-5__0-5-750x450-70.jpg)
मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
‘तानाजी’ चित्रपट ‘बॉक्स ऑफिस’वर हीट होत आहे. महाराष्ट्र आणि मराठी भाषिक लोकांमध्ये या चित्रपटाबाबत कामालीच उत्सूकता आहे. नेटीझन्सही अभिनेता अजय देवगन याच्या अभिनयाचे कौतूक केले आहे. तसेच, ‘तानाजी’ चित्रपट का पहावा…याबाबत आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. त्यातील काही मोजक्या प्रतिक्रीया आम्ही देत आहोत..
काय आहेत प्रतिक्रीया…
- इतर चित्रपटांपेक्षा सर्वात उत्तम पर्याय म्हणून पाहावा..
- काल्पनिक सुपरहिरों ऎवजी आपल्या इतिहासातील खऱ्या खुऱ्या मर्दमावळ्याच्या आभाळा एवढ्या पराक्रमा चा जिवंत अनुभव घेण्यासाठी पाहावा..
- महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास समजण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, आपले गड किल्ले काय होते ते किती महत्वाचे होते आणि आपल्या इतिहासातून आपण काय शिकू शकतो हे समजण्यासाठी पाहावा..
- विद्यार्थ्यांनी, मराठ्यांची गुरील्ला युद्धनीती काय होती, गनिमी कावा म्हणजे काय असतो, सुभेदार तानाजी मालुसरेंचा सर्जिकल स्ट्राईक पाहण्यासाठी पाहावा..
- समोर मृत्यू दिसत असतानाही विजयश्री खेचुन आणणाऱ्या मर्द मावळ्यांच्या शौर्यासाठी पाहावा..
- प्राणाहुन श्रेष्ठ स्वराज्यास माननाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरेंच्या बलिदानसाठी पाहावा..
- प्राणाहुन प्रिय मित्रांच्या बलिदाना नंतर रयतेच्या पालनहाराच्या डोळ्यातील दाटलेले पाणी पाहण्यासाठी पाहावा..
- सिंहगड हाच पूर्वी कोंढाणा होता ज्याचा सिंहगड का झाला याचा इतिहास आणि भूगोल समजण्यासाठी पाहावा..
- -आपला इतिहास पुढच्या पिढ्यांना ही पुन्हा पुन्हा अनुभवता यावा या साठी हा सिनेमा पाहावा..
असा अनेक प्रतिक्रीया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.