नागराज मंजुळेंच्या पत्नीला गुजारा करण्यासाठी कारवी लागत आहे दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images-4.jpg)
सैराटचं नाव घेतलं की आर्ची आणि परशा सोबत नाव येत ते नागराज मंजुळे… या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं. सैराटसह नागराजच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील आणि नविन चेहऱ्यांसह तळागाळातील विषयाचं पडद्यावर सुंदर सादरिकरण करणारा एक लेखक , एक दिग्दर्शक अशी नागराजची ओळख बनलीय. एकीकडे दिग्दर्शक म्हणून नाव होत असताना नागराजच्या वैयक्तीक आणि वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे.
१७ मे १९९७ साली नागराजचे सुनीतासह लग्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture-4.jpg)
दुसऱ्या एका फोटोत नागराज पत्नी सुनीताला घरात गेल्यानंतर मिठाई भरवत असल्याचे दिसत आहे. यांत नागराज आणि सुनीता आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचा सुखी संसार फार काळ काही टिकला नाही.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Capture2.jpg)
दोघांच्या संसारातील अनेक वादविवाद उफाळून येऊ लागले. अखेर २०१४ साली कागदोपत्री ते विभक्त झाले. विभक्त झाल्यावर सुनीता पुण्याच्या चिंचवड भागातील रामनगर परिसरात राहतेय. पोटगी घेऊन जे पैसे मिळाले त्या पैशात सुनीता आपलं गुजारा करतेय… मात्र पुढे पैशाची अडचण भासू लागल्याने त्यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करण्याचे काम सुरू केले. सैराट १०० कोटींच्या घरात गेला आणि त्यातील कलाकारांना लाखो रुपये मिळाले तरीही दिग्दर्शक नागराजची पहिली पत्नी असणाऱ्या सुनीता मात्र हलाखीचं जीणं जगत आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images-4.jpg)
घरची परिस्थिती बिकट असताना पडत्या काळात अर्धांगिनी म्हणून साथ दिली. कसलीही अपेक्षा बाळगली नाही. हालअपेष्टा सोसल्या. त्यांनी मोठे व्हावं, यश मिळवावं, यासाठी मनाला, इच्छा-आकांक्षांना मुरड घातली. ज्यांनी जिवाचे रान केले, त्यांचाच विसर बहुतेक आता यशाच्या शिखरावर असलेल्या नागराज मंजुळे यांना पडला आहे.