breaking-newsक्रिडामनोरंजन

धोनीसोबत डिनरला जाणार बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी

एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचं प्रमोशनही तितकंच महत्त्वाचं असतं. या प्रमोशनमुळेच चित्रपट बऱ्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं. म्हणूनच प्रमोशन किती हटके करता येईल यावर कलाकारांचा अधिक भर असतो. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा ‘लवरात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आयुष शर्मा आणि त्याची सहकलाकार वरिना हुसैन विविध शहरांत जाऊन अनोख्या पद्धतीने आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत.

गुजरात आणि लखनऊनंतर आता हे दोघे रांची शहरात जाणार आहेत. रांचीमधील विविध ठिकाणांनी आयुष आणि वरिना भेट देणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा मूळचा रांचीचा असल्याने आयुष- वरिना त्याचीही खास भेट घेणार आहेत. धोनीसोबत हे कलाकार डिनरसुद्धा करणार आहेत.

वाचा : सनीला अडल्ट फिल्ममध्ये पाहून डॅनियलला काय वाटायचं?

‘लवरात्री’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणी प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेमाचा पहिला बहर आणि एखाद्या प्रेमळ व्यक्तीचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाल्यावर साऱ्या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलतो, याचं चित्रण ‘लवरात्री’तून करण्यात आलं आहे. अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरच आता ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा ‘लवरात्री’ बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button