‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दयाबेनची पुन्हा होणार एंट्री? निर्मात्यांनी दिली ही माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/dishadaya.jpg)
मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने नुकतेच त्याचे 3000 एपिसोड पूर्ण केलेले आहेत. यानिमित्त संपूर्ण टीमने दणक्यात सेलिब्रेशन देखील केले आहे. काही दिवसांपूर्वी या शोमधील दोन कलाकार नेहा मेहता आणि गुरुचरण सिंग यांनी मालिकेला अलविदा केले आहे. त्यांच्याजागी प्रेक्षकांना काही नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. दरम्यान या कार्यक्रमात गेले 3 वर्ष न दिसेलेली दयाबेन अर्थात दिशा वकानी कमबॅक करेल अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत.
‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वकानी जवळपास 3 वर्ष दिसलेली नाही आहे. ती परत येणार का याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. नवरात्रीच्या एपिसोडमध्ये दयाबेन कमबॅक करणार असल्याचा चर्चा सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये रंगलेल्या आहेत. दयाबेन परत येणार का याबाबत माधवी भाभी अर्थात सोनालिकाने अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की, ‘मला याबाबत सध्या कोणती माहिती नाही आहे. आम्हाला देखील इतरांकडूनच याबाबत समजते आहे.3 वर्षांपासून अशा बातम्या येत आहेत मात्र कोणती पक्की माहिती नाही’.