..तर ‘बाहुबली’मध्ये दीपिकाने साकारली असती ‘देवसेना’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/anushka-rajamouli-deepika.jpg)
एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’, ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपली विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटानंतर त्यातील प्रत्येक कलाकार चर्चेत आला. प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी यांच्या भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहतील यात काही शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी प्रभास आणि राणासह नुकतीच ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबत या तिघांनी शोमध्ये मनमुराद गप्पा मारल्या.
गप्पांदरम्यान रंगलेल्या ‘रॅपिड फायर राऊंड’मध्ये करणने राजामौली यांना बाहुबली हिंदीत आला असता तर कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीला अनुष्काच्या जागी घेतलं असतं असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दीपिका पदुकोण हे नाव घेतलं. अनुष्काने साकारलेल्या ‘देवसेना’ या भूमिकेसाठी दीपिका योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचवेळी हिंदी प्रभास आणि राणालाच घेतलं असतं, कारण त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही असंदेखील ते म्हणाले.