Breaking-newsपुणेमनोरंजन
ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर चिंतामण कुलकर्णी यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/manohar-kulkarni.jpg)
पुणे | ज्येष्ठ रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे माजी अध्यक्ष मनोहर चिंतामण कुलकर्णी यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. आज पहाटे ५ वाजून २० मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुलकर्णी हे मनोरंजन संस्थेचे प्रमुख; तसेच गेली ६० वर्षे नाट्यसृष्टीशी संबंधित होते. नाट्य चळवळीचे खंबीर आधारस्तंभ म्हणून मनोहर कुलकर्णी यांची ख्याती होती. त्यांनी सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात विशेष योगदान दिलं आहे. २०१७मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा बालगंधर्व पुरस्कार मनोहर चिंतामण कुलकर्णी (अण्णा) यांना देण्यात आला होता. तसंच सांस्कृतीक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २००० साली शासनाचा सांस्कृतिक पुरस्कारही मिळाला होता.