breaking-newsमनोरंजन
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे निधन
मुंबई – छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे काल निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात संगीता श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीता यांच्या अचानक एक्झिट घेण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
संगीता श्रीवास्तव यांना गेल्या काही दिवसांपासून रक्तवाहिन्या संबंधीचा त्रास होत होता. काल २५ ऑगस्ट रोजी अखेर त्यांचे निधन झाले. संगीता यांनी थपकी प्यार की, इस प्यार को क्या नाम दूँ आणि भंवर या मालिकांमध्ये काम केले होते. उत्कृष्ट अभिनयाने त्या घराघरात पोहोचल्या होत्या.