‘घागर घेऊन… घागर घेऊन…’ फेम गायिका कार्तिकी गायकवाडचं ठरलं, 26 जुलैला साखरपुडा !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/kartiki-gaikwad.jpg)
पुणे | महाईन्यूज
आपल्या गोड आवाजाची झलक दाखवून प्रसिध्दी पावलेली गायिका कार्तिकी गायकवाड आता आयुष्याची दुसरी इनिंग खेळण्यास तयार झाली आहे. 26 जुलै रोजी रोनित पिसे या तरूणाशी तिचा साखरपुडा होतो आहे.
‘सारेगमप’ या संगीत रिअॅलिटी शो मधून कार्तिकीने आपल्या आवाजाच्या जोरावर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘घागर घेऊन… घागर घेऊन’ या गवळनीने तिला तुफान लोकप्रियता मिळाली.
नुकताच तिचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. रोनित हा पेशाने इंजिनिअर आहे. तसंच त्यांचा स्वत:चा व्यवसाय देखील आहे. कार्तिकीचे बाबा कल्याण गायकवाड यांच्या मित्रपरिवातील पिसे कुटुंब आहे. तसंच हा महत्त्वाचा निर्णय माझ्या बाबांनीच घेतला असल्याचं कार्तिकीने आवर्जून सांगितलं. 26 जुलैला साखरपुडा आहे. मात्र, लग्नाची तारीख अद्याप ठरली नसल्याचं देखील कार्तिकीने सांगितलं आहे.
रोनितला देखील संगिताची आवड आहे. तो फार छान तबला वाजवतो. त्याने तबल्याच्या 3 परीक्षा देखील पास केल्या आहेत. इथून पुढे आम्ही दोघे संगीताची आराधना सुरू ठेऊ, असं तिने यावेळी नमूद केलं.