कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्री शिखाला अर्धांगवायू
![Actress Shikha, who serves Corona patients, was paralyzed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/अभिनेत्री-शिखा-मल्होत्रा.jpg)
मुंबई – अभिनेता शाहरुख खान बरोबर “फॅन ‘ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. कोरोनाला तिने हरवले होते, तोपर्यंत आणखी एक धक्कादायक घटना या अभिनेत्रीबरोबर घडली आहे. अभिनेत्रीने कोरोनाला हरवल्यानंतर तिला अर्धांगवायू झाला आहे. तिला मुंबईतील कुपर रुग्णायलात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शिखा एक सर्टिफाइड नर्स आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच तिने रुग्णसेवेचाही वसा घेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील हिंदू हृदयसम्राट ट्रॉमा सेंटरमध्ये ती नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करत होती. सहा महिने तिने ही सेवा केली. त्यावेळीच तिला कोरोनाची लागण झाली होती.
वाचा :-द डर्टी पिक्चरमधील सहअभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यू
शिखाची मॅनेजर अश्विनी शुक्लने इन्स्टाग्रावर पोस्ट करत शिखाच्या पॅरलिसिसबाबत सांगितले आहे. तिने असे म्हटले आहे की, ‘शिखा मल्होत्रा आज पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये आहे. कोव्हिडविरोधात लढाई जिंकल्यानंतर १० डिसेंबरला रात्री पॅरालिसिस स्ट्रोक आल्यामुळे रुग्णलयात दाखल केले असून तीला बोलता येईनासे झाले आहे. तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना.’