‘काळ – सुरुवात अंताची’… घोस्ट हंटिंग करणा-या मुलांची भयकथा,लवकरच…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-17.png)
मराठी सिनेसृष्टीत बऱ्याच कालावधीनंतर एक हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे… ‘काळ – सुरुवात अंताची’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच या ‘काळ’बाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली ही उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘काळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन डी संदीप याने केले आहे. हा चित्रपट घोस्ट हंटिंग म्हणजेच भूतांचा शोध घेणाऱ्या तरुणांवर आधारित आहे. मराठी सिनेसृष्टीत वेगळी वाट चोखाळणारा भयपट म्हणून ‘काळ’कडे पाहिले जात आहे. मराठीमध्ये आजवर ‘लपाछपी’, ‘कनिका’, ‘पछाडलेला’, ‘गोवा ३५० किमी’ अशा अनेक भटपटांची निर्मिती करण्यात आली. परंतु ‘काळ’ आजवर प्रदर्शित झालेल्या इतर भयपटांच्या तुलनेत खूप वेगळ्या प्रकारची मांडणी असलेला चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.
सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. येत्या २४ जानेवारी २०२० रोजी ‘काळ – सुरुवात अंताची’ प्रदर्शित होणार आहे.