Breaking-newsमनोरंजन
‘कहानी घर घर की’ मालिकेतील अभिनेता सचिन कुमारचं निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200516_104818.jpg)
मुंबई : स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘कहानी घर घर की’ आणि सोनी टिव्हीवरील ‘लज्जा’ मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सचिन कुमार याचं निधन झालं. अंधेरीतील त्याच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं असल्याची माहिती आहे. सचिन कुमार हा अभिनेता अक्षय कुमारचा आतेभाऊ होता. सचिनकुमार अवघ्या 42 वर्षांचा होता.
‘लज्जा’ मालिकेचे निर्माते बेनाफर कोहली यांनी देखील सचिन कुमारच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सचिन नेहमी हसणारा आणि गोड स्वभावाचा व्यक्ती होता. त्याच्या अचानक जाण्यानं धक्का बसला आहे, असं कोहली यांनी म्हटलंय.