breaking-newsमनोरंजन

कधीकाळी मेहमूद यांनी ट्रेनमध्ये विकले होते चॉकलेट

महाईन्यूज | प्रतीनिधी

चित्रपटसृष्टीमध्ये मेहमूद यांना ‘किंग ऑफ कॉमेडी’ म्हणून ओळखलं जातं. मात्र या स्थानावर पोहोचण्यासाठी मेहमूद यांना मोठा संघर्ष करावा लागला. विशेष म्हणजे ज्या किशोर कुमारांनी प्रथम मेहमूद यांना काम देण्यास नकार दिला होता, त्याच किशोर कुमारांना मेहमूद यांनी नंतर स्वत:च्या निर्मिती संस्थेने तयार केलेल्या चित्रपटात काम दिले. ‘भूत बंगला’, ‘पडोसन’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘गुमनाम’, ‘कुवारा बाप’ हे चित्रपट महमूद यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे गाजले.

मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मेहमूद यांचे वडिल मुमताज अली बॉम्बे टॉकिजमध्ये काम करायचे. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मेहमूद घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रोज मालाड ते विरार दरम्यान लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट विकायचे. मेहमूद यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. वडिलांच्या ओळखीमुळे त्यांना १९४३ मध्ये बॉम्बे टॉकिजच्या ‘किस्मत’ मधून नशीब आजमवण्याची संधी मिळाली. या चित्रपटात मेहमूद यांनी अशोक कुमार यांच्या बालपणातील भूमिका साकारली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button