ऑस्कर चित्रपट पुरस्करांची नामांकने जाहीर…’जोकर’ला मिळाले तब्बल 11 नामांकने…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-50.png)
2019 ऑस्कर चित्रपट पुरस्करांची नामांकने जाहीर झाली आहेत. यंदाच्या ऑस्कर नामांकनामध्ये ‘जोकर’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. ऑक्टोंबर महिन्यात प्रदर्शित झालेला ‘जोकर’ 2019 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून चर्चेत होता.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/e5e0cb55f9d71d231ff346ed694267c1.jpg)
डार्क ह्यूमर आणि धडकी भरवणारे ड्रामा सिन्सने भरलेल्या जोकरमध्ये अभिनेता जोकीन फिनिक्सने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. त्याने कॉमिक्स जगातील सर्वोत्तम खलनायकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विदूषकाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. परिणामी जोकरने एक दोन नव्हे तर तब्बल ११ वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकने पटकावली.सर्वोत्कृष्ट अभिनेता – जोकीन फिनिक्स, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – टॉड फिलिप्स , सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले – टॉड फिलिप्स, स्कॉट सिलव्हर अशी तब्बल 11 नामांकनं मिळाली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1537552289-joker1.png)
१९४० साली बॉब केन यांनी डिसी कॉमिक्ससाठी जोकरची निर्मिती केली होती. सुरुवातीच्या काळात बॅटमॅन कॉमिक्समधील मुख्य खलनायक म्हणून या व्यक्तिरेखेचा वापर केला गेला. परंतु त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डीसीने या विदूषकाचा वापर चित्रपटांमध्ये देखील करण्यास सुरुवात केली. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामुळे जोकरला खरी प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात अभिनेता हिथ लेजर याने जोकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. खलनायक रुपात झळकलेल्या जोकरला या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कारानेही सन्मानीत केले गेले होते. तेव्हा पासून चाहत्यांनी जोकरवरील एका स्टँड अलोन चित्रपटाची मागणी करण्यास सुरुवात केली होती. परिणामी चाहत्यांच्या आग्रहाखातर या चित्रपटाची निर्मिती केली गेली.