Breaking-newsमनोरंजन
एकताच्या ‘लैला-मजनू’चा टीझर प्रदर्शित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/laila-majnu-teaser.jpg)
एकता कपूरच्या आगामी ‘लैला मजनू’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ही माहिती एकता कपूरने तिच्या ट्विटरवर दिली आहे. ‘लैला- मजनू’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी साजिद अली यांनी घेतली असून एकता कपूरच्या बालाजी मोशन्सअंतर्गंत हा चित्रपट साकार होणार आहे. या चित्रपटाची पटकथा इम्तियाज अली यांनी लिहीली आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने एकता आणि इम्तियाज अली एकत्रित काम करणार आहेत. हा चित्रपट २४ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.