Breaking-newsमनोरंजन
‘उरी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/uri-.jpg)
सर्जिकल स्ट्राईकवरील ‘उरी’ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. यामध्ये विक्की कौशल आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘उरी’मध्ये विक्की कौशल एका दमदार भारतीय कमांडोची भूमिका साकारत आहे. तसेच यात मोहित रैना आणि परेश रावल यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. दिग्दर्शक आदित्य धर आणि विक्की कौशल यांनी यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. हा चित्रपट 11 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, हा चित्रपट २०१६ च्या उरी हल्ल्यावर आधारित आहे. १८ सप्टेंबर २०१६ ला पाकिस्तान आतंकवाद्यांनी जम्मू-कश्मीरच्या उरीत सैन्यावर हल्ला केला. ज्यात १९ जवान शहीद झाले. याच्या ११ दिवसांनंतर भारतीय सेनाने सर्जिकल हल्ला करुन याचा बदला घेतला