आमिर खानच्या एका शब्दावर अक्षय कुमारनं त्याच्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलली…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-127.png)
बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या एका शब्दावर खिलाडी अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. बच्चन पांडे हा चित्रपट आता पुढील वर्षी 22 जानेवारी 2021 ला प्रदर्शित होणार आहे. तर, आमिरचा बहुचर्चित लाल सिंह चड्ढा ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. आमिर खानने यासंदर्भात ट्विट करत अक्षयकुमार आणि साजिद नाडियाडवाला यांचे आभार मानले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आमिर विरुद्ध अक्षय अशी टक्कर आता टळणार आहे. ‘थ्री इडियट’ आणि ‘तलाश’ चित्रपटांनंतर पुन्हा एकदा आमिर आणि करिना ही जोडी या चित्रपटात दिसणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-60.png)
आमिरचा हा चित्रपट हॉलिवूड स्टार टॉम हॅक्सचा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड मिळालेला आहे. आमिरनेही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे.तसेच ‘लाल सिंह चड्ढा’ यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचवेळी अक्षयकुमारचा बच्चन पांडे देखील रिलीज होणार होता. याचा फटका दोन्ही चित्रपटांना बसू शकतो. यामुळेच आमिरने अक्षयकुमार आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांना चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती केली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Akshay-Kumar-vs-Aamir-Khan-1024x569.jpg)
“कधीकधी एक संभाषण पुरं असतं. माझा मित्र अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला यांचे मी आभार मानतो, की त्यांनी ‘बच्चन पांडे’ची रिलीज डेट पुढे ढकलली. त्यांच्या चित्रपटासाठी माझ्या शुभेच्छा.” असं ट्विट आमिरने केलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-33.png)
आमिरच्या या ट्विटला रिट्विट करत हो आमिर आपण नेहमीच मित्र आहोत, असं लिहीत अक्षय कुमारने बच्चन पांडे चित्रपटातील नवीन लुकसह नवीन रिलीज डेट दिली आहे.