‘आता तू म्हातारी झालीस’, अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/ameesha-patel.jpg)
बॉलिवूड सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यामुळे ते सतत सोशल मीडियावर अनेक वेळा काही ना काही पोस्ट, फोटो शेअर करत असतात. या पोस्टमुळे कधी त्यांच्यावर कौतुकांचा पाऊस पडतो तर कधी त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ येते. अशीच वेळ अभिनेत्री अमिषा पटेलवर आली आहे. विशेष म्हणजे अमिषावर ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तिला अनेक वेळा ट्रोल करण्यात आलं आहे.
अमिषाने काही दिवसापूर्वी इन्स्टावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अमिषाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. तिच्या याच फोटोमुळे तिला टीकेला सामोरं जावं लागलं आहे.
अमिषाने शेअर केलेला फोटो पाहून अनेकांनी तिला करिअर शिफ्ट करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी ‘आता तू म्हातारी झाली आहेस’, अशी प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही तर काही नेटकऱ्यांनी वाईट शब्दांमध्येही काही कमेंट केल्याचं पाहायला मिळालं. मात्र अद्याप तरी अमिषाने ट्रोलर्सला उत्तर दिलेलं नाही.
दरम्यान, अमिषाची ट्रोल होण्याची ही काय पहिली वेळ नाही. याआधीही तिला बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी अमिषाने काळ्या ड्रेसमधील एक फोटो पोस्ट केला आहे. तोकड्या कपड्यातील तिचा हा फोटो नेटकऱ्यांना पसंत न पडल्यामुळे त्यांनी या फोटोवर आक्षेपार्ह आणि अश्लील प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं होतं.