breaking-newsमनोरंजन

आणखी एका अभिनेत्याचं कॅन्सरने निधन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड, मालिकांविश्वातून अनेक कलाकारांचं निधन झाल्याच्या धक्कादायक घटना एकामागोमाग एक येत आहेत. एप्रिल महिन्यात इरफान खान, ऋषी कपूर यांचं निधन झालं. आता आणखी एका कलाकाराचं निधन झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि बॉलिवूड अभिनेता मोहित बघेल याचं निधन झालं आहे. मोहित गेल्या कित्येक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होता. अखेर वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी तो कर्करोगाशी लढाई हरला. राज शांडिल्य यांनी ट्विट करत मोहितच्या निधनाची बातमी दिली. राज यांच्या ट्विटनंतर संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून मोहितवर नोएडामध्ये उपचार सुरु होते. अखेर त्याची ही कॅन्सरशी लढाई अयशस्वी ठरली. मोहित बघेलने मोठ्या मेहनतीने छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही आपली खास ओळख निर्माण केली. 2011 मध्ये मोहितने सलमान खानसोबत रेड्डी चित्रपटात छोटे अमर चौधरी ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्याने जय हो या सुपरहिट चित्रपटातही भूमिका साकारत आपली वेगळी ओळख बनवली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button