breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

अमित ठाकरे दिग्दर्शक केदार शिंदेंच्या भेटीला, नव्या मालिकेसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई – कलर्स मराठी वाहिनीवर केदार शिंदे दिग्दर्शित सुखी माणसाचा सदरा ही नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या मालिकेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुभेच्छा देत केदार शिंदे आणि भरत जाधव या दोघांचंही कौतुक केलं होतं. आता अमित ठाकरे यांनीही केदार शिंदे यांची भेट घेऊन मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

केदार शिंदे यांची ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका तुफान गाजली होती. लॉकडाऊनच्या काळातही झी मराठीवर ही मालिका पुनर्प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर केदार शिंदे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनर्रागमन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार, केदार शिंदे यांनीच त्यांच्या नव्या कोऱ्या मालिकेविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. त्यांच्या कार्याची दखल घेत राज ठाकरे यांनीही ट्विट करून केदार शिंदे आणि भरत जाधव यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही केदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

केदार शिंदेंच्या या नव्या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचसोबत भरत जाधवला छोट्या पडद्यावर पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button