अमिताभ बच्चन यांनी केली कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज
![Big Bean paid Rs 2 crore for the construction of Kovid Kendra in Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/596760-amitabh-bachchan.jpg)
मुंबई – बीग बी अमिताभ बच्चन यांनीही कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चन याने यांसदर्भात ट्विट करून माहिती दिली.
अभिषेक बच्चनने ट्विटमध्ये म्हटलंय की, माझ्या वडिलांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आता घरी राहणार आहेत. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयातून डिस्जार्च मिळाला असून ते आपल्या वांद्रेतील जलसा या घरी पोहोचले आहेत.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चनसह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या या चौघांनाही कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारांनंतर ऐश्वर्या आणि आराध्या घरी परतल्या. त्यानंतर, अमिताभ बच्चन यांनीही कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र, अभिषेक बच्चन याच्यावर रुग्णालयात उपचाार सुरू असल्याचे अभिषेकने ट्विटद्वारे सांगितले आहे.