breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सरशी झुंज; अमेरिकेत उपचार सुरू

मुंबई – बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे. सोनालीची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिनं स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोनालीनं बुधवारी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.

सोनालीने आपल्या ट्विटर तसंच इन्स्टा अकाऊंटवर भावनिक पोस्ट करत लिहिले आहे की, ”कधी कधी आयुष्यात अनपेक्षित वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीच विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे.  माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराशी लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. सतत शारीरिक वेदना होत असल्याच्या कारणामुळे काही वैद्यकीय तपासण्या केल्या.  या वैद्यकीय अहवालात मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या आजाराला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत”.

सोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. सोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. ”सोनाली Get Well Soon’, असं म्हणत चाहते  तिच्या आरोग्यासाठी प्रार्थनासाठी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button