Breaking-newsमनोरंजन
अभिनेत्री सेजल आत्महत्येप्रकरणी तब्बल ७ महिन्यांनी प्रियकराला अटक

ठाणे – सिनेअभिनेत्री सेजल शर्मा आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने उद्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनवली आहे. त्याच्यावर प्रेयसी सेजल शर्माला फसवल्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आदित्य वशिष्ट दिल्लीतील एक जीम इंस्ट्रक्टर आणि मॉडेल आहे.
सेजल कृष्णकुमारी शर्मा (२६) मिरारोड पूर्वमधील रॉयल नेस्ट बिल्डिंगमध्ये राहत होती. तिने जानेवारीमध्ये घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ (३०) याला तपासासाठी बोलावलं होतं. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सेजल शर्माच्या आईनेदेखील पोलिसांकडे तक्रार केली होती. अखेर पोलिसांना त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने मिरारोड पोलिसांनी आदित्य वशिष्टला अटक केली.





