breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या; पोलिसांकडे मदतीची मागणी

मुंबई – चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्यानंतर आता तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. याबाबत मालवीने मदतीसाठी मुंबई पोलिसांकडे आर्जव केला आहे. तिने ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.

लग्नास नकार दिल्याने मुंबईत मालवी मल्होत्रावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ती जबर जखमी झाली होती. हल्ल्यानंतर तिच्यावर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्यावर प्लास्टिक सर्जरीदेखील करावी लागली होती. या सर्व प्रकारातून सावरत असतानाच मालवीवर आणखी एक संकट कोसळले आहे. तिला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. याबाबत ट्विट करत तिने म्हटले आहे, ‘योगेश महिपालने माझ्यावर हल्ला केल्यानंतर आता मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्ती यासंदर्भात मला धमकी देत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे बोलले जात आहे.’ तिने पुढे म्हटलंय, ‘या हल्ल्यानंतर मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप घाबरले आहे. यातून सावरत होतेच की आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. अजूनही योगेशचा चेहरा आठवला की मला खूप भीती वाटते. मात्र मुंबई पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली होती. त्यामुळे माझा जीव वाचला’, असे म्हणत तिने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र मालवीने ती धुडकावल्याच्या रागातून त्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. हल्लेखोर आरोपीने फेसबुकवरुन मालवीशी संपर्क साधला होता. याआधी आपण निर्माता असल्याचे सांगून त्याने तीन-चार वेळा तिची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तो मालवीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र तिचा ठाम नकार होता. ती दुर्लक्ष करत असल्याने योगेश तिचा पाठलाग करत असे. मालवीच्या नकारामुळे संतापलेला आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होता. मालवी दुबईहून परतल्यानंतर आरोपी अंधेरीतील वर्सोवा भागात ऑडीने आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्याने मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केले होते. दरम्यान, 29 वर्षीय मालवीने अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button