अभिनेता टायगर श्रॉफचं पहिले गाणे ‘अनबिलिवेबल’ प्रदर्शित!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/tigar-sharff.jpg)
दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर, टायगर श्रॉफने पॉप-कल्चर आउटफिट, बिग बँग म्यूजिकसोबत आपले पहिले वहिले गाणे ‘अनबिलिवेबल’ प्रदर्शित केले आहे. टायगर श्रॉफने याचा एक म्यूजिक व्हिडिओ देखील प्रदर्शित केले असून त्याचे दिग्दर्शन त्याचा जुना सहकारी असलेल्या पुनीत मल्होत्रा द्वारे करण्यात आले आहे. या व्हिडिओच्या मदतीने टायगर आपल्या चाहत्यांना ऑडियो-व्हिज्युअलचा एक शानदार अनुभव देऊ इच्छित आहे.
या लॉकडाउनमध्ये नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या प्रत्येकाप्रमाणेच, टाइगरने देखील या वेळेचा उपयोग स्टूडियोमध्ये आपल्या आवाजावर कठोर मेहनत करून आणि या म्यूजिक वीडियोचे शूटिंग करत घालवला आहे. गाणे आणि संगीताविषयी आपल्या विचारांबाबत बोलताना, टाइगर म्हणतो की, “मला नेहमीच स्वत:च्या चालीवर गायचे आणि नाचायचे होते आणि शेवटी मला ते करायची संधी मिळाली. मी या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खूप उत्साहित आहे- शिकण्यासाठी आणि नवे शोधण्यासाठी खूप काही आहे.”
या महामारीच्या कठीण दिवसात आपल्या चाहत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, टाइगरने सर्व प्लेटफॉर्मवर #YouAreUnbelievable चॅलेंज ची सुरुवात केली आहे. ज्यावर त्यांचे अनेक चाहते जगाला आपले टैलेंट दाखवू शकतील.