अबू सालेमची संजूच्या निर्मात्यांना नोटीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/abu-sanju-6.jpg)
नवी दिल्ली – गँगस्टर अबू सालेमने ‘संजू’ चित्रपटाच्या निर्मात्यांना लीगल नोटीस पाठविली आहे. चित्रपटात त्याच्याविषयी चुकीची माहिती दाखविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून याबद्दल निर्माते राजकुमार हिराणी आणि विधू विनोद चोप्रा यांनी माफी मागावी, अशी मागणी अबू सालेमने केली आहे. शिवाय जर १५ दिवसात माफीनामा प्रकाशित झाला नाहीतर निर्मात्यांवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही अबू सालेमने दिला आहे.
संजू चित्रपटाममध्ये रणबीर कपूर बोलताना दाखविला आहे कि, त्याला शस्त्रे सालेमच्या माणसांनी पुरवली. परंतु अबू सालेमने या वाक्यावर आक्षेप घेत माझे कुठलेही साथीदार शस्त्रास्त्रे पुरवत नसल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, संजू हा २०१८ वर्षातील सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. तसेच रणबीर कपूरच्या करियरमधील सर्वात यशस्वी झालेला सिनेमा आहे.