breaking-newsमनोरंजन

अजय देवगनचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या अफवा

बॉलिवूड सेलिब्रेटीचा अपघात किंवा निधन झाल्याच्या अफवा अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कित्येक यूझर्स अशा मेसेजची सत्यता न पडताळताच तो फॉरवर्ड करतात. बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगनला यावेळी अशा अफवांचा फटका बसला आहे. महाबळेश्वरमधील डोंगराळ भागात अजय देवगनच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे फेक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाले आहेत. या अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाल्याचंही लिहिण्यात आलेलं आहे, मात्र या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही.

महाबळेश्वर पोलिसांनी असा कोणताही हेलिकॉप्टर अपघात झाला नसल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे. या अफवेचे मूळ काय आहे हे शोधून आरोपीपर्यंत पोहचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. 13 मेपासून हे फेक मेसेज व्हायरल झाले आहेत. अभिनेता अजय देवगन सुखरुप असून त्याला कोणताही अपघात झाला नसल्याचे सांगितले जात आहे. अजयच्या चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे आवाहनही केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button