‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये लवकरच अभिजीत आणि आसावरीचे वाजणार सनई-चौघडे…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-64.png)
प्रेमाला कोणतही बंधन नसंत अगदी वयाचंही…हवी असते ती साथिदाराची घट्ट साथ आणि कधीही न गमावणारा विश्वास…बसं एवढं असलं तरी प्रेम बहरत..याचाच प्रत्यय येतो तो ‘अग्गंबाई सासूबाई ‘ या मालिकेतील अभिजीत आणि आसावरी यांच्याकडे पाहिलं की…
अल्पावधईतच प्रक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये सामिलं झालेली मालिका ‘अग्गंबाई सासूबाई ‘ एका रंजक वळणावर आहे. चक्क आजोबांनी अभिजीत आणि आसावरीच्या लग्नाला असलेला त्यांचा नकार आता होकारात बदलला आहे..
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-21.png)
आजोबा त्यांचं मत बदलून या लग्नासाठी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या परवानगीनेच आसावरी आणि अभिजीत यांच्या लग्नाची लगबग चालू झाली आहे.रविवार १९ जानेवारी या दिवशी लग्नाचा मुहूर्त निघाला आहे. सासूबाईंचा हा लग्नसोहळा प्रेक्षकांना १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष भागात पाहायला मिळेल.आजोबा स्वतः असावारीचं कन्यादान करणार असून शुभ्रा ही आपल्या लाडक्या सासूबाईंची करवली होणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/3-11.png)
हा लग्नसोहळा अविस्मरणीय असेल यात शंकाच नाही. अभिजीत आणि आसावरी ही दोन्ही पात्र साकारणाऱ्या निवेदिता सराफ आणि गिरिश ओक या कलाकारांचं सध्या प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात येत आहे.शिवाय आता या पुढे ‘सासूबाईं’चा प्रवास कसा असणार याविषयीसुद्धा कुतूहल प्रेक्षकांना आहे.