breaking-newsमनोरंजन

अखेर बिग बॉसच्या घरातून ‘आऊ’ बाहेर

मुंबई: बिग बॉस मध्ये सर्वात ज्येष्ठ स्पर्धक असलेल्या उषा नाडकर्णी उर्फ ‘आऊ’ यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. रविवारी झालेल्या एपिसोडमध्ये स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत आणि उषा नाडकर्णी ह्या डेंजर झोनमध्ये होत्या. कमी मते मिळाल्यामुळे त्यांना घर सोडावे लागले.

सूत्रसंचालक महेश मांजरेकर म्हणाले, बिग बॉसच्या घरात ७२ वर्षाच्या उषा नाडकर्णी यांनी सलग ११ आठवडे राहणे हीच मोठी कौतुकास्पद बाब आहे. ‘आऊ’ यांना निरोप देतांना शर्मिष्ठा , मेघा, पुष्कर, सई, आस्ताद सर्वजण भावूक झाले होते.

बिग बॉसच्या घरात आता आठ स्पर्धक राहिले असून अंतिम फेरीतील ‘टॉप फाइव्ह’साठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात मागील आठवड्यात वाद व तणावाचे क्षण निर्माण झाले होते. पुष्कर, मेघा, सई, शर्मिष्ठा आणि आऊ यांच्या ग्रुपसाठी हा आठवडा थोडा तणावाचा आणि वादविवादांचा ठरला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button